Pune news..एका मित्राने क्षुल्लक वादातून दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितावर १५ पेक्षा अधिक वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दोघांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
प्रतिनिधी दत्तात्रय गरड.
केसरी न्युज मराठी चैनल, लाईक आणि कमेंट करा.